लाल आखाडा राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती साठी मैदान सज्ज

0

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात
मुरगुड प्रतिनिधी
लाल आखाडा चषक 2019 राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून नेटक्या संयोजनात स्पर्धेचा उदघाटन सोहळा सोमवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 4 वाजता मुरगुड ता कागल येथे पोलीस स्टेशननजीक उभारण्यात आलेल्या विश्वनाथराव पाटील क्रीडा नगरीत मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होत आहेत.गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त स्पर्धा मुरगुडच्या लाल आखाड्याने आयोजित केल्या आहेत.
स्पर्धेचे उद्धघाटन गोकुळचे अध्यक्ष रविंद्र आपटे मॅट पूजन संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वासराव पाटील आहेत.क्रीडा ध्वजारोहन अंबरीशसिंह घाटगे यांच्या हस्ते होणार आहे.दिनकरराव कांबळे, दौलत देसाई,सपोनि विठ्ठल दराडे,बाळ डेळेकर,दत्तामामा जाधव,रघुनाथ कुंभार,सखाराम डेळेकर, मनोज कडोले, बाजीराव चांदेकर, सदाशिव आंगज प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. बुधवार दिनांक 20 रोजी स्पर्धेचा बक्षीस वितरण व रणजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार खास धनंजय महाडिक,म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,महादेवराव महाडिक,माजी आमदार पी.एन. पाटील,आम.अमल महाडिक,अमरसिंह घोरपडे,बाबासाहेब पाटील उपस्थित रहाणार आहेत.
रणजितसिंह पाटील यांनी स्पर्धेची तयारी व क्रीडांगणाची पाहणी केली. भागोजी कुंभार, दगडू शेणवी,बजरंग सोनुले,वासुदेव मेटकर,पृथ्वी कदम,सचिन मगदूम, युवराज सूर्यवंशी, डॉ अशोक खंडागळे, दत्तामामा जाधव प्रकाश भोसले,राजू सोरप,मिरासो बेपारी,युवराज पाटील,सुरेश भिके,बाळकृष्ण मंडलिक,सुरेश शिंदे,रमेश परीट,चंद्रकांत कुंभार,कुमार सावर्डेकर, बंडोपंत कुंभार,अशोक मसवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here