आम. कुपेकरांच्या हस्ते लाकुडवाडीतील अंतर्गत रस्त्याच्या कामांचा शुभारंभ

0

आजरा ( प्रतिनिधी ) :
लाकुडवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार निधी व सभापती रचना होलम यांच्या माध्यमातून जनसुविधा मधून मंजूर झालेल्या निधीतून या कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक सरपंच शंकर कुराडे यांनी केले. गावातील प्रलंबित विकास कामांची माहिती दिली. आमदारांनी आपल्या निधीतून रस्तासाठी ५ लाख निधी दिला. तर लाकुडवाडीची सुकन्या आणि तालुक्याच्या सभापती होलम यांनी जि. प. च्या जनसुविधा योजनेतून ५ लाखांचा निधी दिल्याबद्दल कुपेकर व होलम यांचे ऋण व्यक्त केले.
यानंतर आमदार कुपेकर, सभापती होलम, नंदाताई बाभुळकर, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, साखर कारखान्याचे संचालक एम. के. देसाई,मसणू सुतार, अनिल फडके, राजू होलम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खंदाळे, जयश्री गिलबिले, सविता फडके, सरीता कुपटे, सुभाष मांगले, आण्णाप्पा पाथरवट, आप्पासो आर्दाळकर तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here