अर्जुनवाड्याचे प्राथमिक शिक्षक गणपती कुंभार यांना ‘कुंभार समाज गौरव’ पुरस्कार

0

सेनापती कापशी (प्रतिनिधी) :

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंना दरवर्षी संत शिरोमणी गोरोबाकाका समाज अर्जुनवाडा (ता. कागल) यांचे वतीने समाज गौरव पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा ‘कुंभार समाज गौरव’ पुरस्कार २०१९ विद्या मंदिर अर्जुनवाडा (ता. कागल) चे कृतिशील प्राथमिक शिक्षक गणपती लक्ष्मण कुंभार (अर्जुनवाडा) यांना देवुन सन्मानित करण्यात आले

ते चिकोत्रा खोऱ्यात ग. ल. या नावाने विशेष परिचित असुन एका पायाने अंपग असुन अर्जुनवाडा या गावी त्यांची सलग १९ वर्षे सेवा झाली आहे. या प्रदीर्घ सेवेत शाळा हेच माझे घर व विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू मानून शाळेसाठी विद्यार्थ्याना स्वखर्चाने शिष्यवृत्ती, स्पोर्टस् किट, शालेय उपयोगी साहित्य तसेच पहिलीचा संपूर्ण वर्ग ऑईल पेंटने रंगवून आतील चारही भिंती बोलक्या करुन मुलांना आंनददायी शिक्षण देणे तसेच शाळेला स्वखर्चाने आकर्षक कमान तयार करुन शाळेसाठी दररोज बहुमूल्य वेळ देणारे शिक्षक म्हणून परिसरात त्यांची ओळख आहे. अर्जुनवाडाची मुले-मुली धोका पत्करून चिकोत्रा नदीतून मुगळी हायस्कूल व कॉलेजला जातात म्हणून करड्याळ व अर्जुनवाडा दरम्यान छोटेखानी पूल किंवा साकव व्हावा यासाठीही त्यांची तळमळ आहे. मुलांच्या साठी सदैव कार्यरत राहणारे शिक्षक म्हणून अर्जुनवाडा कुंभार समाजाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here