कोल्हापूर – प्रशांत चुयेकर

जनता दरबार तस नाव ऐकलं की वाटतं, कोणतरी नेता असेल जो आपल्याच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांचे रेशनकार्ड, आधारकार्ड, शासकीय योजना आदी सेवेंचा लाभ देण्यासाठी जनता दरबारची निर्मिती केली असावी. मात्र, निवळ करिअर करणा-या प्रत्येकासाठी मोफत मार्गदर्शन देत चालवलेला जनता दरबार बघून मन हेलविल्याशिवाय राहत नाही. स्पर्धा परीक्षेचे फॅड विद्याथ्र्यांच्यामध्ये इतकं वाढलं आहे की, यामुळे अनेकांनी ‘इतक्या रुपयात अधिकारी होणार’ असा बाजारा मांडला आहे. अशा बाजारात पोहचू न शकणा-या आर्थिक दृष्टया गरीब असणा-या घोडयांच्यासाठी शर्यतीचंच नव्हे १००  टक्के जिंकण्याचं मैदान तयार करणा-या प्रा. दिनेश पाटील यांचं आणि त्यांच पत्नी अस्मिता यांचं कौतूक करावं तितकं कमीच.

 

पोपटपंची मार्गदर्शन नव्हे तर सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेतोपर्यंत विध्यार्थ्यांना अभ्यास करायची सोय पाटील दापंत्यांनी केली आहे. २ वर्षापूर्वी लावलेल्या जनता दरबारांच्या या रोपटयाचे वटवृक्षात रुपांतर होत आहे. या दरबारातील सागर मोहिते हा मुलगा नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सुशांत इंगवले मार्शल आर्ट क्रिडा स्पर्धेत चमकत आहेत. तर पुणे येथे उच्च शिक्षणांसाठी दहा ते पंधरा विद्यार्थी शिकत आहेत. सध्या येथे ४० जन अभ्यास करत आहे.

जनता दरबारमध्ये दखल होण्यापूर्वी अर्चना संदे या मुलीला चाळीस टक्के मार्क्स होते. तिला शेवटच्या वर्षात 80 टक्के मार्क्स मिळाले. आतापर्यंत पंचवीस ते चाळीस विध्यार्थ्यांना घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे. अभ्यासाची इतकी तयारी करुन घेतली जाते की पदवीच्या शेवटच्या वर्षातील मुलगी सेट, नेट पास होणार असल्याची खात्रीही प्रा.पाटील यांनी दिली आहे.

सराव परीक्षा

अक्षर सुधारणेपासून ते विविध परीक्षेच्या तयारीची परीक्षाही याठिकाणी घेतली जाते. समाजशास्त्र विषयाचे पदवीचे शिक्षण घेतलेल्या प्रा. पाटील हे स्वतः सेट उत्तीर्ण आहेत. त्यामुळे या विषयांसह इतर विषयांची तयारीही ते तयारी करुन घेतात. तर पाटील मॅडम सायकाॅलाॅजीमध्ये उच्च पदवीधर आहे. त्यासुद्धा मुलांना समुपदेशन करतात.

सूसज्ज ग्रंथालय

परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज ग्रंथालयाचीही सोय केली आहे. प्रत्येक मुलगा गं्रथपाल आहे. पुस्तके नेत असताना त्या ठिकाणी प्रत्येकजण नोंद करतात. 2000 पेक्षा अधिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. करिअरसाठी आवश्यक असणारी पुस्तके याठिकाणी उपलब्ध आहेत.

संशोधनपर लेख

विविध विषयांत संशोधन करायचे असेल तर ते पुर्णपणे लक्ष देउनच केले जते. एखादया गावाचा सव्र्हे असो की सामाजिक विषय असो प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक काम केले जाते. विद्यापीठातील संशोधनाला लाजवेल असे काम विद्याथ्र्यांच्याकडून पाटील यांनी केले आहे.

प्रत्येक कामाचा पुरावा

नुसत्याच फाइली आणि बातम्यांचे कात्रण झालं की  आपलं काम झालं असे नव्हे तर सरांनी प्रत्येक कामाचा पुरावा असलेला अलबम केला आहे. जनता दरबामध्ये येण्यापूर्वी मुलांचे मार्क्सलिस्ट ते येथून जाताना झालेली प्रगती, त्याचे मार्क्सलिस्टचाही या अलबमध्ये समावेश केला आहे. मुलांच्या सराव परीक्षेचे पुरावेही तारखेसह उपलब्ध आहेत.

पाटील मॅडमच खास फोटोग्राफी

प्रत्येक कामाचा क्षण छायचित्रात टिपण्याचे कामही पाटील मॅडम करत असतात. त्यांचे या विषयाची शिक्षणही पुर्ण झाले आहे.

नेतृत्वालाही संधी

अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे प्रा. दिनेश पाटील यांनी नेतृत्व कसे असावे याबाबतही प्रशिक्षण दयायला सुरुवात केली.आमदार होउ इच्छीणारे अनेकजण जनतेची सेवा कषी करायची याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here