संघटनेच्या नावाखाली एस.टी चे नुकसान

कामावर न येता हजेरी महामंडळाकडून कोणतीही कारवाई नाही

0

प्रशांत

कोल्हापूर – काही सरकारी नोकरदारांचा रुबाब दांडगा. त्यातच सरकारी नोकरीवर हजर न राहताही निवळ पुढारी म्हणून मिरवत रहायचं म्हटल्यावर आणखीणच रुबाब मोठा. संघटनेच्या जीवावर कामावर हजर न राहताही शासनाचे पैसे खाणारे अनेकजण आहेत. कोल्हापुरातील ताराबाई पार्क एस.टी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतही असाच प्रकार घडला आहे. कामावर हजर न राहताही अधिका-यांशी हातमिळवणी करुन पगार लाटणा-या मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकारी यांची ही भानगड बाहेर आली आहे. मात्र, संघटनेच्या दबावाखाली अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

राष्ट्रीय परिवहन महामंडळ विभागीय कार्यशाळा ताराबाई पार्क कोल्हापूर येथील मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी यांचा यामध्ये सहभाग आहे. यांच्यासह अन्य कर्मचारीही यामध्ये सहभागी आहेत. मान्यताप्राप्त संघटनेचे या विभागाचे अध्यक्ष सहायक कारागीर मेकॅनिक असणार संतोष रामचंद्र जाधव सचिव  बाॅडीफिटर  शौकत मुजावर, तर  प्रमुख कारागीर रविंद्र माने यांच्यावरही कार्यवाहीचा भडगा उगारला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते, एस. टी. महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्ष अधिकारी मनोज बोहिया, व्यवस्थापक संचालक रणजीतसिंह देवोल यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.

पाच दिवसापासून पस्तीस दिवसांची पगारी सुटी

या कर्मचा-यांच्यासह अन्य कर्मचारीही संघटनेच्या जीवावर दांड्या  मारत असतात. त्यांच्याबाबतही गोपनीय अहवाल वरिष्ठांना दिला आहे. मात्र कोल्हापुर आगारातून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जाधव याने 41 दिवसांची सुटी घेउनही त्याची हजेरी नोंद आहे. माने याने सोळा दिवस गैरहजर राहूनही हजर दाखवले आहेत तर मुजावर याने पाच दिवसाचा फायदा घेतला आहे. यांच्यासह इतर नउ कर्मचा-यांनी बदली सुटीचा गैरफायदा घेतला आहे.

कुलकर्णी यांनी केली पाठराखण

याबाबत सुरक्षा रक्षक यांनी कार्यशाळाप्रमुख यंत्र अभियंता शिवदत्त  कुलकर्णी यांना वेळोवेळी सांगुनही त्यांनी कर्मचा-यांना दमदाटी केली आहे. याबाबत काय कारवाई केली असे विचारले असता आपल्याला ते माहित नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यापुर्वी कुलकर्णी यांच्यावर कारवाई झाली होती. कारवाई होउनही कुलकर्णी यांनी असे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. याचे गौडबंगाल काय आहे याबाबतही एस.टी. कर्मचा-यांच्यामध्ये जोरात चर्चा सुरु आहे तर आगार प्रमुख नवनीत भानप यांचा संपर्क  होऊ शकला नाही.फेब्रूवारी 2015 ते एप्रिल 2017 पर्यंत हा प्रकार सुरु आहे.

दोन रुपयेचा हिशोब चुकला तर होते कारवाई

दोन रुपयाचा हिशोब चुकला तर वाहकांच्यावर कारवाई होते. या ठिकाणी मात्र ४१ दिवस गैरहजर राहूनही कामावर हजर असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनेकडे दुर्लक्ष कसे काय ? याबाबतही मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचा-यांच्यामध्ये चर्चा होत आहे.

मेमो दिली असल्याची चर्चा

याबाबत या कर्मचा-यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ते नियमितपणे कामावर हजर आहेत. त्यांना मेमो दिला असल्याची चर्चा कार्यशाळेतील कर्मचा-याच्यामध्ये होत आहे.

कार्यशाळेत कर्मचारी कमीच

कोल्हापूर विभागीय कार्यशाळेत 50 टक्के कर्मचारी कमी आहेत. तरीही काही कर्मचारी 10 ते 15 दिवस गैरहजर राहतात. कार्ड पंचिंग नसतानाही या कर्मचा-यांनी हजेरी मांडण्याचा प्रकार केला आहे. जादा कामाच्या नावावरही अधिक सुट्या घेत असल्याचा प्रकार वाढत आहे.

कामे होत नाही

कर्मचारी अपुरे असल्यामुळे कार्यशाळेत आलेल्या एस.टी. ची कामे होत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर असणा-या गाडयाही म्हणाव्या त्या प्रमाणात चांगल्या दुरुस्ती होत नाहीत.  कामचुकार कर्मचा-यांच्यामुळे दर्जेदार  कामे होतात काय याबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.कामे होतात काय याबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here