कोल्हापुरात कॅन्सर सेंटर तर्फे ‘स्तन कर्करोग’ जागृतीसाठी विद्यायक उपक्रम

0

प्रशांत चुयेकर

कोल्हापुर – विविध सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणा-या कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे स्तन कर्करोग जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आजपासून स्तन रोग आजारावर माहिती व जनजागृती तपासण्या करण्यास सुरुवात झाली आहे. मोफत तपासणी सुरु असून मोठ्या शस्त्रक्रियेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. सुरज पवार व डाॅ. रेश्मा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ. सुरज पवार म्हणाले, दरवर्षी १ लाख ७५ हजारच्या नवीन केस दखल होतात. कोल्हापुरात वर्षाला ६ हजार रुग्णांची तपासणी होते. रोज दोन रुग्ण या आजाराचे सापडतात. आक्टोबर महिना हा जगभरात ‘स्तन कर्करोग जागृती’ म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने सेंटरतर्फे महाविद्यालये बॅंका विविध शाळा, महिला बचत गट, विविध कारखान्यात काम करणा-या महिलां व झोपडपटृीत राहणा-या महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व महिलांना याचा फायदा घ्यावा, असे आवाहन डाॅ. पवार यांनी केले. यावेळी डाॅ. रेश्मा पवार यांनी सेंटरतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

आजाराची कारणे

पाश्चात्य संस्कृतीनुसार उशीरा लग्न करणे, २५ ते ३० वयोगटानुसार लग्न न करणे, याच वयात अपत्य न होउ देणे, स्तनपान न करु देणे, अनुवंषिकता यासह वेळोवेळी स्तनात झालेल्या गाठीच तपासणी न करणे यामुळे स्तनामध्ये कर्करोगासारखे आजार होउ शकतात. याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले.

आजारावर उपाय

स्तनाची महिन्याला तपासणी करणे, २५ ते ३० या वयोगटात लग्न करणे, याच वयात मुले होउ देणे, त्यांना स्तनपान करणे, यामुळे स्तनावरील आजाराव मात करता येत असल्याचे डाॅ. रेश्मा पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here