नागरिकांना वळिवाच्या पावसाने मिळाला गारवा

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेले अनेक दिवस नागरिक उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले होते. सोमवारी दुपारपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच अनेक ठिकाणी वीजा देखील कडाडत होत्या. जिल्ह्याच्या अनेक भागात वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. तर काही भागात रात्रीच्या सुमारास वळीव बरसला. यामुळे उन्हाने लाही लाही होणार्‍या शरिराला गारवा मिळाला आहे. शेती पिकांना काही प्रमाणात पाणी मिळाल्याने बळीराजालाही सुखावला आहे. तर ऐन रंगपंचमी दिवशी बरसलेल्या मेघराजामुळे रस्त्यावरचा रंग धुवून जाऊन स्वच्छता झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची मात्र तारांबळ होताना दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here