सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार

अल्ताफ कुसरुध्दीत अत्तार यांचे उपोषण

0

नामदेव गुरव
कोल्हापूर – कर्मचा-यांची बदली करुनही ते बदलीच्या ठिकाणी जात नाहीत, एखदा खाबूगिरीची सवय लागली की, ती सुटत नाही, त्यामुळे बदली झाली असली तरी जून्याच ठिकाणी काम करत असलेले कित्येक कर्मचारी षासकीय कार्यालयात दिसत असतात. कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय कार्यालयात असाच प्रकार दिसत आहे. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी जात नसल्याच्या निषेधार्थ अल्ताफ कुसरुध्दीत अत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसापासून उपोषण सुरु केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर सर्कल येथील कनिष्ठ लिपीक महादेव बडजकर हे सिनीअर क्लार्क नसताना त्यांना टेंडरचे काम शासनाच्या कोणत्या नियमाने दिले आहे, ते 15 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून एकाच कार्यालयात काम करीत आहेत. त्यांची बदली होउनही ते त्याच ठिकाणी काम करत आहेत. सीसी टिव्हीच्या चित्रफित पाहील्यानंतर ते याच कार्यालयात कायम काम करत असल्याचे दिसत आहेत. सुरेष सखाराम लांबोरे हे सुध्दस 19 वर्षापेक्षा अधिक वर्ष याच विभागात कार्यरत आहेत. त्यांचीही कागदोपत्री बदली झाली असली तरी ते त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्या जिल्हयाबाहेर का केल्या जात नाहीत, यापाठीमागचा शोध घ्यावा, अषी मागणीही अत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here