कोल्हापुरातील नेत्यांचे उत्पन्न वाढले : नितेश राणे यांची टीका

0

प्रतिनिधी कोल्हापूर :  अनेक पक्षाच्या नेत्यांनी राज्यात सत्ता भोगली पण कोल्हापुरातील जनतेचे उत्पन्न वाढले नाही. मात्र नेत्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली. पक्षात शिस्त महत्वाची आहे. शिस्तीत पक्ष वाढावा, कार्यकर्त्यांचा जुगार खेळणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दयानंद नागटाळे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मतांसाठी कार्यकर्ते आणि जनतेचा वापर करून घेतला. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आज कोल्हापुरातही कार्यकर्त्यांची तशीच अवस्था झाली आहे. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने जनतेला स्वाभिमान पक्षाचा आधार वाढत आहे. आमचा पक्ष शिस्त पाळणारा असल्याने लोकांचा ओढा वाढला आहे. शिवसेना शिस्तीत वाढली मात्र आता शिस्त बिघडली आहे. मनसे बदनाम झाली आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढील कोणत्याही निवडणूक स्वाभिमान पक्षाला वगळून होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक जिल्ह्याध्यक्ष सचिन तोडकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाबाईची मूर्ती, शाल, तलवार देऊन राणे यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here