कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान 

0

शिरोळ (प्रतिनिधी) :

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हा व तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात अाले. तसेच प्रा. रवींद्र पाटील संपादित ‘जागल्या’ विशेषांकाचे व ‘इंद्रधनुष्य’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉ. शिवराम भोजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व वृक्षरोपांना पाणी घालून समारंभास प्रारंभ झाला.

यावेळी बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, पत्रकार दिनानिमित्त जिल्हास्तरीय पत्रकारांच्या मेळाव्यातून विचारमंथन होत आहे. पत्रकारांचे संघटन ही काळाची गरज आहे. जिल्हा पातळीवर पत्रकार संघटनेने केलेले कार्य कौतुकास्पद असून लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव झाला. हा उपक्रम प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले.

पद्मश्री डॉ. शिवराम भोजे म्हणाले, पत्रकारांनी समाजाभिमुख पत्रकारिता सेवेचे व्रत जोपासले पाहिजे. बातमीतील सत्यता शोधण्याचे काम चाणाक्ष वाचक करीत असतात. राजकारण अथवा अन्य घटका पासून दूर राहून पत्रकारिता केली पाहिजे. थोडक्यात व मुद्देसूद बातमी हवी. अलीकडच्या काळात फेक बातमी देऊन विचारांचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या स्पर्धेच्या काळात फेक नको चेक असणारी सत्य बातमी हवी.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव समीर देशपांडे म्हणाले, शहरी व ग्रामीण पत्रकार व त्यांचे प्रश्न यांची घुसमट सुरू आहे. त्यांना सन्मानाने जगण्याइतपत योग्य व समाधानकारक मानधन मिळायला हवे व त्यांच्या आरोग्याचे प्रश्न याबाबत विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पत्रकारांचे आरोग्य व अन्य सेवा सुविधा देण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबत संघटना पातळीवर आम्ही पाठपुरावा करीत आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, प्रत्येक भागाचा विकास साधण्यासाठी पत्रकारांनी विशेष लिखाण करण्याची गरज आहे.

यावेळी नंदकुमार राजाराम कांबळे (कागल) इलेक्ट्रॉनिक मीडिया बीन्यूज, महालिंग दत्तात्रय पाटील दै. पुढारी ( जि. बेळगांव), जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार : प्रा.रवींद्र  बाबासो पाटील दै. सकाळ (कबनूर ) त्याचबरोबर तालुका उत्कृष्ट पत्रकार : संपत पाटील, दै.महाराष्ट्र टाईम्स, (चंदगड), मुकुंद पवार, संपादक साप्ताहिक (शाहुवाडी), इकबाल रेठरेकर, एस न्यूज (गगनबावडा), डॉ. निवास वरपे, लोकमत (करवीर),  प्रकाश खतकर, दै. तरूण भारत (भुदरगड), मधुकर किरुळकर, दै. तरुण भारत (राधानगरी), विवेक दिंडे, दै.सकाळ (हातकणंगले), विनायक पाटील, दै.तरुण भारत (गडहिंग्लज), धनाजी गुरव, दै. पुढारी (पन्हाळा), संतोष बामणे, दै. पुण्यनगरी (शिरोळ ), समीर कटके, दै. तरूण भारत (कागल ), रमेश चव्हाण, दै. महाराष्ट्र टाईम्स (आजरा), अनिल तोडकर, दै. पुण्यनगरी  (हातकणंगले) यांना  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रारंभी स्वागत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले. यावेळी सचिव सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, खिद्रापूरचे सरपंच हैदरअली मोकाशी, मराठी पत्रकार परिषद कोल्हापूर महानगर अध्यक्ष ताज मुल्लाणी, कोषाध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी,  अॅड. प्रशांत पाटील, कौन्सिल सदस्य अतुल मंडपे, सुरेश कांबरे, प्रा.भास्कर चंदनशिवे, दयानंद लिपारे, लक्ष्मण कांबरे, डॉ. टी. एस. पाटील, सलीम खतीब, जागल्या स्मरणिकेचे संपादक जिल्हा संघटक प्रा. रवींद्र पाटील , अवधूत आठवले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, अनिल धुपदाळे, रवींद्र पाटील, चंदगडचे समन्वयक प्रा. अशोक पाटील, तालुका अध्यक्ष संतोष तारळे, विनोद पाटील, दयानंद खानोरे, कोर कमिटी मेंबर संतोष सणगर, भाऊसाहेब सकट, सुहास जाधव, आनंदा काशिद, विवेक स्वामी, बाळासाहेब चोपडे, अरूण तळेकर, कृष्णात माळी, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, सुभाष बोरगे, रविंद्र हिडदुगी, संजय पाटील, अमर वरुटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कौन्सिल सदस्य दगडू माने यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here