आदमापूरला रविवारी पत्रकार कार्यशाळा : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजन.

0

मुरगूड प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे रविवार दि.3 मार्च रोजी आदमापूर (ता.भुदरगड) येथे कागल,भुदरगड,राधानगरी, चंदगड,आजरा,गडहिंग्लज,करवीर व निपाणी अशा 8 तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली.
आदमापूर येथील त्रिवेणी हाॕटेलच्या नवीन इमारतीतील हाॕलमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेत सकाळच्या पहिल्या सत्रात पत्रकारांचे चर्चासत्र संपन्न होईल.तर दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा.शिवाजीराव जाधव हे”ग्रामिण पत्रकारीता”विषयावर दु.12 ते 2 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.जेष्ठ पत्रकार प्रा.भास्कर चंदनशिवे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत.
कार्यशाळेस संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे,उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील,कोषाध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी,कौन्सील मेंबर नंदकुमार कांबळे,अतुल मंडपे,सुरेश कांबरे, डॉ.निवास वरपे,डॉ.टी.एस. पाटील,दीपक मांगले,शशिकांत राज,जिल्हा संघटक प्रा.रविंद्र पाटील,अवधूत आठवले,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे,अनिल धुपदाळे,बेळगांव जिल्हाध्यक्ष विठ्ठल केसरकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कागल तालुका अध्यक्ष महादेव कानकेकर,मुरगूड शहराध्यक्ष प्रा.शाम पाटील,भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी खतकर, राधानगरी तालुका अध्यक्ष अशोक पाटील,करवीर तालुका अध्यक्ष अमर वरूटे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष रविंद्र हिडदुगी,आजरा तालुका अध्यक्ष बशीर मुल्ला, चंदगड तालुका अध्यक्ष संपत पाटील यांच्यासह ७ तालुक्यातील अशोशिएशन चे पदाधिकारी,सर्व दैनिकांचे पत्रकार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here