भाजप नेत्याला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्यास अटक

0

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील भाजपचे नेते व उद्योजक रमेश रेडेकर यांच्याकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी करून त्याची पूर्तता न केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या श्रीधर शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) या फरार आरोपीला शुक्रवार पहाटे आजरा पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता त्यास १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या रेडेकर व त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शिंगटे याच्या अटकेमुळे गडहिंग्लज उपविभागात खळबळ उडाली आहे.

रेडेकर यांनी गेल्या काही वर्षात नवोदीत उद्योजक तसेच चंदगडमधून विधानसभेला भाजपचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष होते. तर या प्रकरणातील आरोपी शिंगटेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्रे प्रकरणी त्याच्यावर आधीच गडहिंग्लज आणि कोल्हापूर पोलिसात गुन्हे नोंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here