रेडेकर हॉस्पिटलतर्फे नैसर्गिक प्रसूती मोफत

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यासह सीमाभागातील नामवंत केदारी रेडेकर हॉस्पिटल, शेंन्द्रीमाळ, गडहिंग्लज येथे खास गरोदर माताकरिता सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन अनिरुद्ध रेडेकर यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले, १ फेब्रुवारीपासून या सुविधा खुल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक प्रसूती मोफत तसेच सिझेरियन प्रसूती नाममात्र दरामध्ये करण्यात येत आहे. तसेच गर्भवती महिलांची सोनोग्राफी ५० टक्के सवलतीच्या दरात करण्यात येत आहे. गरोदर मातांच्या आरोग्याबाबत आजही काही प्रमाणात उदासिनता दिसून येते. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणजे दोन जीवांची काळजी करणे होय. त्यामुळे या सवलती उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. या सवलतींच्या अधिक माहितीसाठी हॉस्पिटलमधील डॉ. किरण गोरूले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here