केदारी रेडेकरचे विध्यार्थी आकाशवाणीवर

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : केदारी रेडेकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा कोल्हापूर आकाशवाणीवर सामूहिक गायनाचा कार्यक्रम १० फेब्रुवारी व १७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होईल.
उंच उंच गगनात तिरंगा, कडे गर्जले सह्याद्रीचे, उंच उंच गगनात तिरंगा फडकतो, भारत भूचे रक्षण करण्यास अशी १२ समूहगीते संगीत शिक्षक संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थी सादर करणार आहेत. आणि ह्या निमित्ताने विध्यार्थ्यांना ध्वनीमुद्रनाचा अनुभव मिळाला आहे. मधुरा जाधव, अक्षता पाटील, श्रेया बागेवाडी, आर्यन जाधव, ओम गायकवाड, सृष्टी बांदेकर, संकल्प येझरे, श्रुती जाधव, साक्षी स्वामी, तेजस्वी हरळीकर, प्राची देसाई, सारा हरळीकर, झेबा मकानदार, तनुजा पाटील, पवन देशमुख, अकसा काजी, वेदांत माने, वेदिका काईनगडे, सानिका सावेकर, ऋतुजा रावण, आसिम जमादार, रोहन भोसले यांनी ही गीते गायली आहेत. सतीश गोरुले यांची ढोलकी, मनीष भौमिक यांचा तबला, डॉ. अतुल जाधव यांची गिटार, ऋषिकेश दड्डीकर यांची साईड रिदमची साथ लाभली आहे. आकाशवाणीवरील निवेदक सुजाता कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. केदारी रेडेकर संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव सुनील शिंत्रे, प्रशासनाधिकारी स्नेहल रेडेकर यांचे प्रोत्साहन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here