केडीसीसीच्या शिरोळ शाखेत चोरी

0

शिरोळ (प्रतिनिधी) :

येथील नृसिंहवाडी रोडवरील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरोळ तालुक्‍याच्या मुख्य शाखेत २२ लाख रुपये किंमतीच्या ७३ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्‍याचे समोर आले आहे. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून सोन्याचे लॉकर तोडून सोन्यावर डल्‍ला मारला आहे. शिवाय बँकेतील इतर महत्वाची कागदपत्रेही विस्कटून टाकली आहेत.

रविवार (दि. ३०) रात्री १२ ते सोमवार (दि. ३१) रोजीच्या पहाटे ४ या वेळेत ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी गॅसकटर, सिडी, दोरीचा वापर करून खिडकीतून आत प्रवेश करून ही चोरी केली आहे.

या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी ठसे तज्ञ आणि डॉग स्कॉडच्या माध्यमातून तपास गतीमान केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही नृसिंहवाडी रोडवर असून, त्यामागे शेती आहे. त्यामुळे चोरट्यांनी याचा फायदा उठवत बँकेच्या मागील बाजूच्या शेतीच्या बाजूकडील खिडकीचे गज कापून बँकेत प्रवेश करुन ही चोरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here