कागल तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी आर. डी. पाटील

0

कागल (प्रतिनिधी) :

कागल तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व सेवकांनी शिक्षक व शिक्षण सेवकांच्या उन्नतीसाठी उभारलेली कागल तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कागल तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मुगळी विद्यालयाचे सहायक शिक्षक राजेंद्र दत्तात्रय पाटील तथा आर.डी.पाटील व उपाध्यक्षपदी कॉम्रेड जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय बानगेचे सहायक शिक्षक शिवाजी गणपती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हि निवड सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक ए. पी. खामकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. निवड सभेला एम. एस. पाटील, एकनाथ माने,को.जि.मा. संचालक अरविंद किल्लेदार, एस. बी. पाटील, के. आर. खामकर अशोक वारके, डी. एस. नाईक, ए. के. कांबळे, वसंत राऊत, सौ.शामल पाटील व एस.एम. पाटील उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष आर. डी. पाटील यांचा सत्कार कोजिमाशिचे उपाध्यक्ष अरविंद किल्लेदार यांनी तर उपाध्यक्ष शिवाजी गुरव यांचा सत्कार माजी अध्यक्ष एम. एस. पाटील यांनी केला. प्रास्ताविक व आभार व्यवस्थापक संजय मगदूम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here