कागल मधील रस्त्यांसाठी आठ कोटी मंजूर : आम.हसन मुश्रीफ

0

प्रतिनिधी कागल :
कागल तालुक्यातही; रस्त्यांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांच्या निविदा लवकरच पूर्ण होऊन रस्त्यांच्या कामान लवकरच सुरुवात होईल, असेही पत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर झालेल्या या रस्त्यांमध्ये खालील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
बानगे ते गोसावी वस्ती – ८५ लाख रुपये, सुळकुड ते तळेवाडी रस्ता – १ कोटी २७ हजार रुपये, खडकेवाडा ते कदम अड्डा रस्ता – ६२ लाख रुपये, कुरणी ते माळवाडी रस्ता – ६७ लाख रुपये, माद्याळ ते राऊतवाडी व पुढे होडगेवाडीपर्यंत – १ कोटी १० लाख रुपये, सावर्डे बुद्रुक ते विकासवाडी रस्ता – २ कोटी १९ लाख रुपये.
तसेच सरकारच्या ५०५४ या योजनेअंतर्गत एक कोटी २३ लाख निधी मंजूर झालेल्या रस्त्यांची नावे अशी. गोरंबे – हदनाळ रस्ता : ४१ लाख रुपये. बेलेवाडी काळम्मा ते माद्याळ रस्ता – २५ लाख रुपये. हमीदवाडा ते सदाशिवनगर पर्यंत – आठ लाख रुपये. सेनापती कापशी ते कोलेवाडी रस्ता – दहा लाख रुपये. सुळकुड ते हेगाजे मळा – १४ लाख रुपये. कसबा सांगाव ते लबाजे मळा – २५ लजख रुपये.
भाजप सरकारच्या कारकिर्दीमध्ये गेल्या साडेचार वर्षात ज्या – ज्या ठिकाणी विरोधी आमदार असतील. त्या – त्या ठिकाणी निधी देताना सरकारने हात आखडता घेतला आहे परंतु; रस्त्यांच्या निधीसाठी विधानभवनाबरोबरच, विधानभवनाच्या पायऱ्यांवर व रस्त्यांवर उतरून आंदोलन केल्यामुळे सरकारला हा निधी देणे भाग पडले आहे, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here