विधानसभेला जीवनदादांना बळ देण्याचे आ. नितेश राणेंचे आवाहन

0

गारगोटी (प्रतिनिधी) :

आगामी विधानसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघांचा आमदार हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विचाराचा पर्यायाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असेल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. त्याचबरोबर जीवन पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सारेजण बळ देऊया व लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठाम राहूया, असे आवाहनही त्यांनी केले.

कूर (ता. भुदरगड) येथे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आयोजित जीवन कृषी प्रदर्शनात आ. राणे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृषी प्रदशनाचे आ. राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे माजी नगरसेवक सुहास लाटोरे होते. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.जालंधर पाटील, जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, शिवाजीराव चौगले, माजी नगरसेवक सुनील कदम, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, अजित पोवार, माजी जि. प. सदस्य पी. डी. पाटील, विनायक राऊत, मानसिंग पाटील, प्रवीण आरडे, सरपंच अनिल हळदकर, अनिल पाटील, संकेत सावंत, दादासो पाटील यांच्यासह राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील युवक, महिला, नागरिक उपस्थित होते. जीवन कृषी प्रदशनात 110 स्टॉल मांडण्यात आले आहेत. यावेळी १ टन वजनाचा बैल आकर्षण ठरत आहे.


यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी भाजप -शिवसेना सरकारवर कडाडून टीका केली. राधानगरी व सिंधुदुर्ग तालुक्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जीवनदादा पाटील यांना विधानसभेसाठी ताकत देण्याचे आवाहन युवकांना केले. या सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली आहे. शिवसेना आणि भाजपने लोकांना गेली पाच मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. तू मारल्या सारख कर, मी रडल्यासारखं करतो अशी भूमिका आजपर्यंत यांनी केली आहे. राधानगरी भूदरगडचा आमदार नारायण राणे यांच्या विचारसरणीचा असेल, कारण माझा मतदार संघ या मतदार संघाला लागून आहे. हा मतदारसंघ म्हणजे माझा भाऊ असे बोलून अप्रत्यक्षरित्या जीवन पाटील यांच्या उमेदवरीवर शिक्कामोर्तब केले. २०१९ चा राधानगरी विधानसभेचा आमदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असेल असे ही ते सांगण्यात विसरले नाहीत तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा हा खासदार धनंजय महाडिक यांना असेल असे त्यांनी या कृषी प्रदर्शनात जाहीर केले.

स्वागत प्रवीण आरडे यांनी केले. प्रास्तविक जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. आभार पी.एस.हळदकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here