मुरगुड येथे अपूर्व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न तब्बल चाळीस उपकरणांचे माहितीपूर्ण सादरीकरण

0

मुरगुड येथे अपूर्व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
तब्बल चाळीस उपकरणांचे माहितीपूर्ण सादरीकरण
मुरगुड प्रतिनिधी
मुरगुड ता.कागल येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर या जि.प. प्राथमिक शाळेत अपूर्व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.अत्यंत साध्या आणि दैनंदिन वापरातील साहित्य आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून बाल गोपालानी विविध वैज्ञानिक उपकरणे बनवून त्या द्वारे जटिल विज्ञान तत्वे स्पष्ट करण्याचा अभिनव उपक्रम साजरा केला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्धघाटन शालेय समितीचे अध्यक्ष भरत लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापिका सौ.राजश्री कुलकर्णी,रवींद्र भोई,विलास पाटील,अलका कदम,उपाध्यक्षा सौ.शीतल संदीप खराडे, प्रमुख उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात मुलांनी 40 उपकरणे तयार केली व त्यांचे माहितीपूर्ण सादरीकरण केले. पवनचक्की,ठिबक सिंचन, घरगूती एअर कुलर,ज्वालामुखी उद्रेक मॉडेल, शोषखड्डा,जमिनीची धूप कारणे व उपाय, हवेचा दाब,पाण्याचे असंगत आचरण, जडत्व, प्राणवायू, ज्वलन या शास्त्रीय संकल्पना सोप्या पद्धतीने व बाल भाषेत समजावण्यात आल्या होत्या.या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी पालक यांनी घेतला.प्रदर्शनाच्या माध्यमातून लहान मुलांच्या भाषिक सादरीकरणास अपूर्व संधी मिळाली.
यावेळी माधुरी यादव,अरुण सुतार,संतोष मांगोरे, मोहन मिसाळ,अक्षता बाबर, शोभा मांगोरे,भाग्यश्री मुसाई, पूजा घोटणे आदी उपस्थित होते.

फोटो मुरगुड: जीवन शिक्षण विद्या मंदिर येथील अपूर्व विज्ञान सोहळा उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी भरत लाड,मुख्याध्यापिका सौ राजश्री कुलकर्णी,सौ शीतल खराडे, आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here