जायकवाडी धरण पुन्हा भरले…

0

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे आज उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात प्रतिसेकंदाला १५ हजार ६९० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक-नगर भागातील पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडावे लागले. काल संध्याकाळी १० दरवाजे उघडण्यात आले होते आणि ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. आज पहाटे पुन्हा एकदा धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here