जयभिम शिंदे यांना संगीत दिग्दर्शनासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

0

सागर के

व्हेनेझुएला देशात झालेल्या फाइव्ह कॉटिनेंट्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जयभिम सुर्यभान शिंदे यांना संगीत दिग्दर्शनासाठीचा बेस्ट ओरिजनल स्कोअरहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार पल्याडवासीया मराठी चित्रपटासाठी केलेल्या संगीत दिग्दर्शनाबद्दल  मिळाला आहे. शिंदे हे मुळचे उस्मानाबाद जिल्हयातील परंडा या गावातील असुन शिवाजी विध्यापीठातील संगीत विभागात पी. एच. डी करत आहेत. संगीत विषयामध्ये ते दोन वेळा नेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना सामाजिक आशयावरील तब्बल २५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर अनेक लघुपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले असून कोल्हापूरातील करवीर नाद या ढोल-ताशा पथकाचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here