बेळगाव जिल्ह्यातील जवान राहूल शिंदे पश्चिम बंगालमध्ये शहीद

0

बेळगाव (प्रतिनिधी) :

पश्चिम बंगालच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बेळगावमधील खानापूर तालुक्यातील झाडनावगा येथील जवान राहुल वसंत शिंदे (वय २४) हे शहीद झाले आहेत. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा हल्ला झाला.

राहुल हे चार वर्षांपूर्वीच सीमा सुरक्षा दलात रुजू झाले होते. नुकतेच त्याचे लग्न ठरविण्यात आले होते. पुढील महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. त्याआधीच देशसेवा बजावताना राहुल यांना शुक्रवारी वीरमरण आले. राहुल यांचा मोठा भाऊदेखील भारतीय लष्करात सेवा बजावत आहे. राहुल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here