जरळी हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन

0

जग झपाट्याने बदलत आहे. दोन महिन्यापूर्वी असलेले तंत्रज्ञान आणि आताच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झालेला पहायला मिळतो. त्याचपद्धतीने यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलतो. त्यासाठी वाचन, लेखन, वर्तमानपत्रे वाहन, आणि संवाद ही मूलभूत कौशल्ये आत्मसात केल्याशिवाय स्पर्धा परीक्षेला सामोरे जात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएफएस अधिकारी स्मिता पाटील यांनी केले.

जरळी (ता. गडहिंग्लज) येथील जरळी हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमात स्मिता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सरपंच गौरी लोंढे अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामदैवत श्रीसिध्देश्वर मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
स्मिता पाटील यांनी आपल्या दीडतास विद्यार्थ्यांबरोबर दिलखुलाससंवाद साधत यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा म्हणजे काय? त्याची निवड प्रक्रिया अशी असते. याबाबत मार्गदर्शन केले.
प्रारंभी मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सतीश शेटे यांना पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सौ. पाटील व पिताश्री बाळगोंडा पाटील यांचा गौरी लोंढे त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता देशपांडे यांचे भाषण झाले.
यावेळी बाळासाहेब पाटील, ग्रामसेवक मारुती नांगरे, सुरेश पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक संभाजी जाधव, अमृत भोसले, महारुद्र हुक्केरी, अनिल जोशी, श्री. कदम, ए. के. फुटाणे, कुमार मास्तोळी, नंदकुमार लोंढे, ज्योती कांदे, वैभवी चौगुले, रावसाहेब कांबळे, अशोक चितारी, विजय गिलबिले, सविता सासूलकर, महादेव चौगुले यांचयसह कॉलेज युवक माध्यमिक व प्राथमिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस.एस. शेटे यांनी सूत्रसंचालन केले तर बसवराज बाबाण्णावर यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here