अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनांनंतर जैन्याळमधील उपोषण मागे

0

कागल (प्रतिनिधी) :

आपल्या विस्तारित
घराची नोंद ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे केली नसल्याच्या कारणावरून कुंटुबासहित जैन्याळ (ता. कागल) येथिल लक्ष्मी कृष्णा कारंडे यांनी ग्रामपंचायती समोर चालु केलेले आमरण उपोषण
दुसर्‍या दिवशी सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एम. कुंभार यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.

निवासी बांधकामाची नोंद घालुन करमागणी पावती व घरठाण उतारा गुरूवार (दि. ७) पर्यंत देण्याच्या लेखी आश्वासानानंतर कारंडे यांनी उपोषण मागे घेतले. त्याप्रमाणे सूचनाही ग्रामपंचायतीस देण्यात आल्या. मात्र दिलेल्या कालावधीत माझ्या मागणीची पूर्तता न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर मला आत्मदहनशिवाय पर्याय नसल्याचे अनिल कारंडे यांनी आधिकर्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सरपंच सौ हौसाबाई बरकाळे, माजी सरपंच परशराम शिंदे, संजय बरकाळे, गटविकास अधिकारी एस. एम. कुंभार, विस्तार अधिकारी अमोल मुंडे, ग्रामसेवक गोंविद पवार, धनाजी शेळके, अभिजित तांबेकर, आनंदा शेटके, महादेव डावरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here