यंदा कर्तव्य आहे! २७ नोव्हेंबरला जहीर-सागरिकाचं शुभमंगल

0

भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान आणि चक दे गर्लसागरिका घाटगे यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की झाली आहे. २७ नोव्हेंबरला सागरिका जहीरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सागरिकाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या तारखेबाबत तिनं खुलासा केलाय.
मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. मात्र आता दोघं लग्न कधी करणार याची वाट सगळे पाहत होते. मात्र ही उत्सुकता आता संपली आहे. जहीर आणि सागरिका यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा सुरू असताना युवराज आणि हेजलच्या लग्नात ते दोघे एकत्र दिसले होते. त्यांचे लग्नातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जहीरचे आधी अभिनेत्री इशा शर्वानीसोबत प्रेमसंबंध होते, 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर जहीर आणि सागरिका एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here