गव्याच्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील इटेचा शेतकरी ठार

0

आजरा (प्रतिनिधी) :

इटे (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात रामचंद्र गोविंद कांबळे (वय ६१) हे शेतकरी ठार झाले. गावानजिकच्या जांभूळ शेत येथील ओढ्यावर त्यांच्यावर गव्याने हल्ला केला. आजरा तालुक्‍यात सोहाळे येथे पंधरा दिवसांपूर्वी गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली होती. ही घटना ताजी असताना त्यानंतर हा दुसरा हल्ला झाला आहे. दुपारच्या दरम्यान हा हल्ला झाला असावा असा अंदाज आहे.

कांबळे हे दररोज गावाशेजारील चित्री प्रकल्पालगतच्या जंगलात बकरी चारायला नेत असतात. ते सकाळी बकरी या जंगलात घेवून गेले. ते घरी परत आले नाही पण बकरी परत आली. त्यामुळे कुटुंबाला संशय आला. त्यांनी ग्रामस्थांना यांची माहीती दिली. ग्रामस्थांनी बॅटरी घेऊन जंगलात त्यांचा शोध घेतला. त्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी जंगल पिंजून काढले. ते जांभूळ शेत ओढ्यावर मृतावस्थेत आढळून आले.

हा हल्ला गव्याने केल्याची ठिकाणी पाऊल खुणा उटल्यावरून समजत होते. वनविभागाच्या पथकाने रात्री उशीरा जंगलात जावून पंचनामा केला आहे. वनपाल डी. बी. कातकर, वनरक्षक एस. एस. संकपाळ, कृष्णा डेळेकर, एल. एस. पाटील यांनी पंचनामा केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here