तेजो महालय नाही ताजमहलच – पुरातत्व विभाग

0

ताजमहालाची निर्मिती बादशहा शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या कबरीसाठी केली होती, असा अहवाल पुरातत्व विभागाने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

२०१५ साली आग्रा जिल्हा न्यायालयात सहा वकिलांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटलं होतं की, ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते आणि त्याला तेजो महालय या नावाने ओळखलं जात होतं. इतकेच नाही तर ताजमहालात काही बंद खोल्या आहेत त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी करण्यात आली होती. या परिसरात आरती करण्याची परवानगी द्यावी असेही याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय संस्कृती मंत्रालय, गृह सचिव आणि एएसआय यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. या प्रकरणी गुरुवारी एएसआयने गुरुवारी आपलं स्पष्टीकरणं दिलं आहे.

या याचिकेवरील पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here