जेनेरिक औषधांची नावे लिहिणे बंधनकारक

0

मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्‍या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नावे वाचण्यास योग्य व कॅपिटल लेटरमध्ये नमूद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ.दिलीप वांगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here