रजापूरची तुती लागवड व आडूळच्या बोंड अळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0

राजू म्हस्के

औरंगाबाद : आडूळ येथील शेतकरी दत्ता सरग  यांच्या साडेचार एकरावरील कपाशीच्या  लागवडीखालील क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज विधानसभा  सदस्य संदिपान भूमरे यांच्यासह पाहणी केली.  पाहणीनंतर  त्यांनी शासकीय नियमानुसार याबाबत कार्यवाही पार पाडण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

             पैठण तालुक्यातीलच  रजापूर येथील किशोर मापारी यांनी  केलेल्या तुती लागवड प्रकल्पालाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट दिली. या गावांत 15 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तुती लागवड केली त्याबद्दल श्री. राम यांनी समाधान व्यक्त केले. कपाशीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे तुती लागवडीतून आर्थिक समृद्ध व्हावे. पथदर्शी स्वरुपात पैठण तालुक्याला तुती’  चे हब बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. इतर शेतकऱ्यांनीही मापारी यांच्या अशा प्रकारचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेती करावी, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांशी संवादही त्यांनी साधला.  यावेळी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनीही तुती लागवडीबाबत विचार मांडले. पैठण तालुक्यात तुती लागवडीचे चांगले काम केल्याबद्दल रेशीम संचालनालयाचे डी.ए.हाके, सातदिवे यांचा जिल्हाधिकारी श्री. राम यांनी यावेळी सत्कार केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here