उद्योगांना कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाची गरज – आनंद माने

0

सध्याच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात उद्योगांना कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाची गरज आहे. तसेच, ती गरज पूर्ण करण्यासाठी इंडस्ट्रीयल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शन गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे आनंद माने यानी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये एम.बी.ए.अधिविभागामार्फत आयोजित इंडस्ट्रीयल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शन या कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी आनंद माने बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.डी.टी. शिर्के म्हणाले, सातत्याने होणारे औद्योगिक क्षेत्रातील बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास या क्षेत्रात काम करण्याची प्रचंड संधी उपलब्ध होवू शकते.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये साऊंड कास्टिंगचे अध्यक्ष व्ही. एन. देशपांडे यांनी तर द्वितीय सत्रामध्ये मार्केटिंग डायरेक्टर संजीव तुंगतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अधिष्ठता डॉ. ए. एम. गुरव यांनी क्वॉलिटी मॅनेजमेंटबाबत माहिती विशद केली. एम.बी.ए विभागाचे संचालक डॉ.एच.एम.ठकार यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. डॉ. (श्रीमती) डी. आर. इंगवले व श्रीमती. गं. व्ही. खारगे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

यावेळी डॉ.एस.एस. महाजन, डॉ. के. व्ही. मारुलकर तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here