भारतीय वनसेवेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील १० उमेदवारांचा समावेश

0

नवी दिल्ली : भारतीय वन सेवेचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील 89 उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 10 उमेदवारांचा यात समावेश आहे.

भारतीय वनसेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने डिसेंबर 2018 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 28 जानेवारी 2019 ते 1 फेब्रुवारी 2019 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात आली. यानुसार आज अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील 89 उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 10 उमेदवारांचा यात समावेश आहे.

गुणांकन यादी नुसार महाराष्ट्रातील निवड झालेल्या उमेदवारांची नावे
देशातील 89 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण 10 उमेदवारांचा समावेश आहे. श्रीकांत कुंडलिक खांडेकर(33), अनिल रामदास म्हस्के (49), जीवन मोहन दगडे (56), चंद्रशेखर एस. परदेशी (59), अनिकेत मारुती वानवे (66), योगेश विलास कुलाल (68), विक्रम सुरेश नाधे (71) हर्षराज दिनकरराव वाठोळे (77), पीयुष अशोक गायकवाड (85), धनंजय कुंडलीक वयभासे (89) आदींचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here