भारतीय फलंदाजांची न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर शरणागती

0

हॅमिल्टन :  चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली. न्यूझीलंडविरुद्धची ही भारताची दुसरी नीचांक खेळी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here