India vs NZ 5th Odi : वन डे मालिकेचा शेवट विजयाने करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

0

 

वेलिंग्टन : न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या वन डे सामना रविवारी वेलिंग्टनच्या मैदानात खेळवला जाणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया चौथ्या वन डेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. तसेच महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त असल्याने तो ही वापसी करणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं लागोपाठ तीन सामने जिंकून पाच सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. पण हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्या वन डेत किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा अवघ्या 92 धावांत खुर्दा उडवून, भारतीय फलंदाजांची अब्रू वेशीवर टांगली.

हॅमिल्टनच्या त्याच लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निश्चयानं टीम इंडिया वेलिंग्टनच्या मैदानात दाखल झाली आहे. धोनी संघात परतल्याने संघाला मजबुती मिळाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर असणार आहे.

भारतानं 3-1 ने मालिका आधीच खिशात घातली आहे. मात्र सलग दुसरा सामना जिंकून न्यूझीलंड पुढील टी-20 मालिकेत आत्मविश्वासाने उतरण्याचा प्रयत्न करेल.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्या.

न्यूजीलंड : केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गुप्टिल, कोलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, टाड एस्टल, लोकी फग्युर्सन, मॅट हेनरी, कोलिन मुनरो, जिम्मी नीशाम, मिशेल सेन्टनर आणि टिम साउदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here