Ind vs Nz 3rd T20 : आज टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये इतिहास घडविणार ?

0

 

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड संघांमधील तिसरा आणि अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना उद्या हॅमिल्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियाला हा सामना जिंकून न्यूझीलंड दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी आहे.

भारतीय संघानं यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी आणि वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर टीम इंडियानं दहा वर्षांनी न्यूझीलंडमध्ये वन डे सामन्यांची मालिका जिंकली. आता हॅमिल्टनचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकला, तर भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका जिंकता येईल.

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 219 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला न्यूझीलंडने 139 धावांत रोखलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 158 धावांत रोखलं होतं. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं सामना जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशी बरोबरीत आहेत. त्यामुळे आजच सामना निर्णायक ठरणार आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारतानं संघात काहीही बदल केले नव्हते. मात्र तिसऱ्या अखेरच्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने संघ बदलाचा विचार केला, तर युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात जागा मिळू शकते.

संघ

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम एस धोनी, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज .

न्यूजीलंड – केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रासवेल, कोलिन डे ग्रांडहोमे, लोकी फर्ग्युसन, स्कॉट के, कोलिन मुनरो, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेइफर्ट, ईश सोढी, टिम साउदी, रोस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here