India vs New Zealand 5th ODI : भारताचा शेवट गोड, न्यूझीलंडवर 35 धावांनी मात

0

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :  अंबाती रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण त्यांची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला 252 धावा करता आल्या.
भारताच्या गोलंदाजांनाही यावेळी भेदक मारा केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने तीन विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here