पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ६ बळींची गरज

0

ॲडलेड (प्रतिनिधी) :

भारताने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अजिंक्य राहाणे(७०) आणि चेतेश्वर पुजाराच्या (७१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ३०७ धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंचा डाव घसरला. चौथ्या दिवस अखेर कांगारुंचे ४ फलंदाज १०४ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहोचले आहेत. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर अजून २१९ धावा करण्याचे आव्हान असेल. तर भारताला विजयासाठी ६ फलंदाजांना बाद करायचे आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुाजरा आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी करुन आघाडी २०० च्या पार नेली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली. पहिल्या डावात झुंजार शतक ठोकणाऱ्या पुजाराने याही डावात शतकाकडे वाटचाल सुरु केली. पण, लायनच्या एका चेंडूवर तो फसला आणि बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने पुन्हा निराशा केली. पहिल्या डावात चांगली फलंदाजी करणाऱ्या रोहितने लायनच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका मारत कसोटीत दमदार पुनरागमन करण्याची नामी संधी गमावली होती. त्याच प्रमाणे दुसऱ्या डावातही रोहित लायनच्या फिरकीचा बळी पडला.

दरम्यान, अजिंक्य रहाणे आपल्या अर्धशतक पूर्ण केले. लंचपर्यंत खेळ थांबाला त्यावेळी भारताने ९५ षकटात ५ बाद २६० धावा केल्या. लंचनंतर भारताच्या फलंदाजीला गळती लागली. पंत २८ धावा करुन माघारी परतला तर अश्विनही फार काही करु शकला नाही. त्यानंतर लायनला आतापर्यंत चांगले खेळणाऱ्या अजिंक्यने रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न फसला आणि तो ७० धावांवर माघारी परतला. अजिंक्य बाद झाल्यावर भारताची शेपटानेही एकामागून एक पॅव्हेलियनचा रस्ता धरला. इशांत, शमी आणि बुमराह शून्यावर बाद झाले आणि भारताचा दुसरा डाव ३०७ धावांवर संपला. पहिल्या डावात मिळालेल्या १५ धावांची आघाडी पकडून भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३२३ धावांचे आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनने भेदक मारा करत ४२ षकटात १२२ धावा देत भारताचे ६ फलंदाज बाद केले. त्याला स्टार्कने चांगली साथ देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंचा डाव घसरला. फिंचला अश्विनने ११ धावांवर बाद करत कांगारूंचा पहिला धक्का दिला. त्यानंतर काही चांगले फटके खेळणाऱ्या हॅरिसचा (२६) अडसर शमीने दूर केला. त्यानंतर आलेल्या ख्वाजालाही फार काही करता आले नाही. तो ८ धावांची भर घालून परतला. ख्वाजा बाद झाल्यानंतर शॉन मार्शने हँडस्कबच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, शमीने ही डोकेदुखी ठरणारी जोडी फोडली. त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया परभवाच्या छायेत आला. दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १०४ धावा केल्या. भारताकडून अश्विन आणि शमीने प्रत्येकी दोन बळी टिपले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here