तिसर्‍या दिवसअखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि १६६ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव  २२५ धावांवर आटोपल्यांनंतर भारताकडून सलामीवीरांनी ६३ धावांची सुरुवात मिळवून दिली. हे दोघे बाद झाल्यावर कोहली पुजाऱ्याने डाव सावरला. पण कोहली ३४ धावांवर बाद झाला. मात्र पुजारा ४० धावांवर मैदानात आहे. स्टार्क हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी टिपला.
चहापानापर्यंत भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावाच्या तुलनेत मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र या भागीदारीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं त्यांना जमलं नाही. लोकेश राहुलने ४४ धावा करुन पहिल्या डावातलं अपयश पुसून काढण्याचा प्रयत्न केला.
त्याआधी, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही ७ बाद १९१ अशी होती. तिसऱ्या दिवसाच्या खेळात पावसाने दोन वेळा व्यत्यय आणल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपल्या धावसंख्येत ४४ धावांची भर घालू शकले. ट्रॅविस हेडने ७२ धावांची अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्नही अपुरेच पडले. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या आघाडीवर शिक्कामोर्तब केलं.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनीही वाखणण्याजोगी कामगिरी केली. इशांत शर्मा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या सर्व प्रमुख गोलंदाजांना सामन्यात विकेट मिळाल्या. आश्विन-बुमराहने प्रत्येकी ३-३ तर इशांत-शमीने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here