शिवाजी विद्यापीठात वेब रेडिओ व वाय-फाय प्रकल्पाचे उद्घाटन

0

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दिक्षांत समारंभानिमित्त दूर शिक्षण केंद्र आयोजित वेब रेडिओ वरील संदेशाचे लोकार्पण व विद्यापीठ वाय-फाय प्रकल्पाचे उद्धाटन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये करण्यात आले.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहचवण्यात वेब रेडिओ निश्चितपणे यशस्वी होईल. विद्यापीठातील उपक्रमांना चालना देण्यासाठी विद्यापीठाचे स्वत:चे एक प्रभावी माध्यम म्हणून वेब रेडिओ निश्चितपणे महत्तवपूर्ण भूमिका पार पाडेल. विद्यापीठीय ज्ञानातून, तत्वज्ञानातून, समाजाची विविध, क्षेत्रांतील प्रगती अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिने, ज्ञानवृध्दीसाठी कार्यक्रम प्रसारित करणे हा वेब रेडिओच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.

विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत सुरू करण्यात येत असलेला हा एक अत्यंत महत्वाचा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांसह श्रोत्यांना या वेब रेडिओच्या कार्यक्रमांचा मोठा लाभ होईल. तसेच विद्यापीठ वाय-फाय प्रकल्पामुळे संशोधनास चालना मिळणार असून निश्चितपणे याचा उपयोग विद्यापीठातील सर्व घटकांना होणार आहे.

या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठ व मंुबई विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य, कुलसचिव, सिनेट सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर सुत्रसंचालन समन्वयक डॉ. नितिन रणदिवे यांनी केले तसेच दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव कॅप्टन डॉ. एन. पी. सोनजे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here