उपराष्ट्रपतींच्या हस्ते वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील शस्त्रक्रिया कक्षाचे उद्घाटन

0

वर्धा : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नव्याने बांधण्यात आलेल्या शस्त्रक्रिया कक्ष तसेच स्कील लॅबचे उद्घाटन उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपराष्ट्रपती श्री.नायडू यांनीया वैद्यकीय संस्थेत जेनेरीक औषधींचे वाटप तसेच आयुर्वेदिक उपचार केले जातात का आदी बाबींची विचारणा केली. यावेळी डॉ. कलंत्री यांनी सादरीकरणाद्वारे उपराष्ट्रपतींना वैद्यकीय संस्थेबद्दल माहिती दिली. यात स्वस्त दरात देण्यात येणाऱ्या औषधी, माता व बाल आरोग्य केंद्र, शस्त्रक्रिया कक्ष आणि देण्यात येणाऱ्या सुविधा, रुग्णालयाची माहिती, ग्रामीण भागात देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा, आरोग्य विमा, कर्करोगावरील उपचार आदी बाबींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here