मोहोळमध्ये क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मोहोळ स्टेशन येथील दत्त प्रशाला क्रीडा संकुलात संपन्न

0

मोहोळ : जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आज दत्त प्रशाला मोहोळ स्टेशन येथील क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. पंचायत समितीच्या सभापती समता गावडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती साधना देशमुख, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, प्रशालेचे अध्यक्ष दीपक गायकवाड, सचिन नामदेव केवळे, मुख्याध्यापक विष्णू मस्के, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण ऐगोळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या असल्याने पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटात व मुलामुलींच्या वेगवेगळ्या घेण्यात आल्या. यातील विजेत्या खेळाडूंना व संघांना जिल्हा स्तरीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

तर, यशस्वी खेळाडूंना स्पर्धा झाल्यावर त्वरित शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षण विभागातील विषय शिक्षक, केंद्रप्रमुख, दत्त प्रशाला मोहोळ स्टेशन येथील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here