बेकायदा दारू विकणाऱ्यांसह पिणाऱ्यांवरही गडहिंग्लजमध्ये कारवाई

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ):
गडहिंग्लज – कडगाव मार्गावरील लिंगनूर हद्दीत बेकायदा दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल वैभवाच्या मालकासह इतर एकूण ८ जणांवर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यात सुमारे ९ हजार २४५ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. दारूची विक्री करणाऱ्यांसह मद्यप्राशन करणाऱ्यांवरील कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनील रामचंद्र माळगे (वय ५४, रा. लिंगनूर), शिवाजी सुरेश चव्हाण (वय ४०, रा. नूल ) यांनी विदेशी दारूची विक्री केली. हॉटेलच्या डायनिंगमध्ये बसून रमेश शिवाजी खांडेकर (वय ५४), अमित कृष्णा दावणे (वय ३३), दत्तात्रय लक्ष्मण कुरळे (वय २४), संजय गोपाळ कुडचे (वय ३२, सर्व रा. लिंगनूर, का नूल), अरुण कृष्ण पाटील (वय ३२), अविनाश मारुती पाटील (वय २५, दोघेही रा. बेकनाळ) यांच्यावर विनापरवाना मद्यप्राशन केल्याने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक रविकांत भैरू शिंदे यांनी फिर्याद दिली असून तपास हवालदार मुळीक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here