आयआयटी प्रवेश परीक्षा आता पूर्णपणे ऑनलाईन

परीक्षा केंद्रावर पेन-पेपरने ऐवजी संगणकावरच द्यावी लागणार उत्तरं.

0

देशभरात आयआयटीच्या प्रवेश परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. लॉजिस्टिक्स आणि मूल्यांकन प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी २०१८ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

२०१८ पासून जेईई (अॅडव्हान्स) ऑनलाईन पार पडेल. परीक्षेसंदर्भात इतर माहिती लवकरच देण्यात येईल, असं आयआयटी मद्रासचे संचालक आणि जेएबी २०१७ चे अध्यक्ष प्रा. भास्कर राममूर्ती यांनी दिली.

ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर निवडावं लागणार आहेच. मात्र परीक्षा केंद्रावर पेन आणि पेपरने उत्तरं लिहिण्याऐवजी संगणकावरच उत्तरं द्यावी लागतील. सध्या आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑप्टिकल मार्क रीडिंग (ओएमआर) शीट्स वापरल्या जातात. पेन किंवा पेन्सिलने त्या सोडवल्यानंतर मशिनवर त्यांचं मूल्यांकन होतं.

देशभरातील इंजिनिअरिंग कोर्सेसच्या अॅडमिशनसाठी जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. आयआयटी किंवा एनआयटी प्रवेशास पात्र ठरण्यासाठी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा आहे. ही परीक्षा ऑनलाईन करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु होते, मात्र पुरेशा पायाभूत सुविधांअभावी हे रखडलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here