शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही : आ. मुश्रीफ

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

राज्यात भाजपा-शिवसेना सरकार आले, त्यांनी कोणत्याही नवीन योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या नाहीत. उलट आम्ही आणलेल्या योजनांमध्ये बदल करून त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या. आमच्या योजना हिसकावून घेण्याचे काम युतीच्या सरकारने केले आहे. युती सरकारची जनतेची दिशाभूल करण्यातच त्यांची पाच वर्षे निघून गेली आहेत. असा टोला आ. हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते गडहिंग्लज येथील महिला व युवतींच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी खा. धनंजय महाडीक, आ. श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, शासकीय योजना, मुलभुत सेवा-सुविधा, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लावून शाश्वत विकासाचे स्वप्न फक्त सक्षमपणे राष्ट्रवादीच पूर्ण करू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या मागे महिलांनी खंबीरपणे उभे राहिल्यास आपण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. जनतेला केंद्रबिंदू मानून आपल्या सरकारने कामे केली आहेत. जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम कऱण्याचे काम केले आहे. युतीने नवीन योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या नाहीत. तर उलट आम्ही आणलेल्या योजनांमध्ये बदल करून त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही पोहचवलेल्या योजना हिसकावून घेतल्या आहेत. जनतेची दिशाभूल करण्यात त्यांची पाच वर्षी निघुन गेली आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेना पुन्हा संधी द्यावी. जर आपले सरकार आले तर सरसकट कर्ज माफी करण्याचा मानस राहुल गांधीजींचा आहे. त्यासाठी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे राहिले पाहिजे असल्याचे सांगितले.

आ. श्रीमती संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या की, आज बचत गटांची चळवळ गतिमान करणे ही काळाची गरज आहे. बचत गटांना रोजगार देणे, गृहउद्योग चालू करण्यासाठी आपला विशेष प्रयत्न राहील. देशात आणि राज्यात खोटी आश्वासने देवून सरकारने जनतेची प्रचंड नाराजी स्विकारली आहे. शेतकरी, विविध धर्मांचे आरक्षण, आंगणवाडी सेविका, शिक्षक अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्यात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देवून शरद पवारांचे हात बळकट करावेत, असे आवाहन केले.
यावेळी कौलगे-कडगाव मतदार संघ, गडहिंग्लज शहरातील पदाधिकारी, महिला, युवती उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here