मृत्यू आला तर असा भव्य दिव्य मृत्यू यावा.. – पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे 

0

राजू म्हस्के

औरंगाबाद: पोलीस प्रशासनात कर्तव्य बजावत असताना जर मृत्यू आला तर असा भव्य दिव्य मृत्यू यावा असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे यांनी, २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करताना केले. मिलिंद मल्टिपरपझ शाळेत २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली व संविधान दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

मिलिंद मल्टिपरपझ शाळेच्या प्रांगणात २६ डिसेम्बर २००८ ला मुंबई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शाहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व संविधान दिना निमित्त रविवारी सकाळी कार्यक्रम पार पडला. भीमा कोरेगाव विजय स्तंभ कृती समिती, ख्रिस्ती कृती समिती ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती व विविध बुद्ध विहाराच्या समित्या, व विविध सामाजिक संस्थाच्या संयुक्त विद्यमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, अप्पर विभागीय उपायुक्त शिवानंद टाकसाळे, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाटगे,  माजी सभापती रतनकुमार पांडागळे, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर, ऍड बी एच गायकवाड, माधवराव बोरडे, नगरसेविका आशा निकाळजे, नगरसेविका विजया बनकर, विजय निकाळजे, जेम्स अंबिलढगे, मुख्याध्यापिका ए पी गोलकोंडा, निवृत्त समाजकल्याण आयुक्त आर के गायकवाड, प्रा प्रतापराव कोचुरे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक विल्सन सिरील, निवृत्त पोलीस अधिकारी सावंत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संविधान दिना निमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यातील शाहिद वीरांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मुंबई हल्ल्यातील शहिदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

 पोलीस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेछा दिल्या. मुंबई हल्ल्यातील शाहिद जवान व अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करीत त्या म्हणाल्या की, पोलीस प्रशासनात कर्तव्य बजावत असताना जर मृत्यू आला तर असाच भव्य दिव्य मृत्यू यावा असे त्या म्हणाल्या. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले कि, संविधान दिनानिमित एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत तर २६/११ च्या हल्ल्यातील शाहिदासाठी दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले नसते तर आज मी महापौर होऊ शकलो नसतो. बाबासाहेबामुळे आपणा सर्वांना हा सुवर्ण काळ आला आहे. या संविधानाला सर्व जग सॅल्यूट करतं. असेही ते म्हणाले.विभागीय उपायुक्त शिवानंद टाकसाळे यावेळी म्हणाले कि, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक सूर्य आहेत. त्यांच्या प्रकाशाची किरणे जो घेईल तो पुढे जाईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अजून कोणाला कळले नाहीत, जेव्हा ते सर्वांना कळतील तेव्हा सगळ्यांची प्रगती होईल. त्यांचे विचार आपण अंगिकारले पाहिजे, संविधानाला अंगीकृत करा मानवीयता जपा असेही ते म्हणाले. 

प्रा. प्रतापराव कोचुरे व निवृत्त पोलीस उपअधीक्षक विल्सन सिरील यांच्या संचाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. यावेळी रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला होता. दिवसभर चाललेल्या या शिबिरात १६० दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढी घाटी च्या डॉकटर व त्यांच्या चमूने काम पाहिले. नेत्र  तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिरात ५०० पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९३ नागरिकाना मोतीबिंदू सदृश्य लक्षणे आढळून आले. सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे यांच्या संकल्पनेतून मागील ६ वर्षांपासून लायन्स क्लब च्या मदतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजियत केल्या जात असून त्यातून ६०० पेक्षा अधिक रुग्नावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभर चाललेल्या या मुंबई  अतिरेकी हल्ल्यातील शाहिदाना श्रद्धांजली व संविधान दिना निमित्त आयोजित कार्यक्रम व शिबीर यशस्विरित्या पाडण्यासाठी निवृत्त पोलीस निरीक्षक बिपीन निर्मळ, साहेबराव रोडगे, संदीप शेगावकर, नीरज मगरे, सुमित काळे, संदीप पगारे, अमोल सहजराव, अविनाश जगधने, राजेश कांबळे, देविदास आराक, विल्सन गायकवाड, सदानंद सरतापे, नंदकिशोर चुंचेकर, विनोद वैरागड आदींनी परिश्रम घेतले. गधने, राजेश कांबळे, देविदास आराक, विनोद वैरागड आदींनी परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here