बेदरकार टॅंकरची दहशत

अनेक अपघातांमध्ये नागरीक जखमी

0

अलिकडच्या काळात आपल्याला पाण्याच्या टॅंकरने अपघात झाल्याच्या बातम्या रोजच वाचायला मिळतायंत.  ९० दिवसांत पाणी, १०० एमएलडी पाणीपुरवठा, चार दिवस सतत पाऊस पडुनसुद्धा टॅंकर कसे सुरु राहतात ह्याचा प्रश्न जनतेला पडला आहे.

आपले आमदार आणि माजी महापौर पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले, तरीही टॅंकर सुरुच आहेत. रिकाम्या टाक्यांचे जोरदार उद्घाटन समारंभ करुन झाले. ते कमी पडतात तर केंद्र सरकारच्या योजनांचेसुद्धा उद्घाटन करुन झाले.

ज्या गावांवर जबरदस्तीने मनपा लादण्यात आली त्यांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या ? घरपट्टी वाढवणार नाही असे सांगून निवडुन आल्यानंतर वाढीव घरपट्टी नियमांनुसार आहे हे सांगू लागले.

मध्यंतरी वसई पुर्वेच्या दुषित पाणीसाठ्यातुन टॅंकर भरुन वसईविरारला दिले जात असल्याचे विडीओ पुराव्यानुसार दिसुन आले होते.

वसईविरार शहरात विकासाच्या नावाखाली बकालपणा वाढत गेला. विशेषतः सोपारा पुर्व आणि विरार रेल्वे स्थानकाच्या परीसरात मोकळेपणाने श्वास घेण्याची सोय नाही. अतिक्रमण हे विकासाचे दुसरे नाव झाले. खुद्द पोलिसांसाठी राखीव जागेवर अतिक्रमण झाल्याचे समोर आले.

एकीकडे धड आरोग्यसेवा नाही, दुसरीकडे गावातुन शिल्लक असलेल्या पाण्याचा अनिर्बंध उपसा, रिकाम्या खाणीत साचलेल्या पाण्याचा पुरवठा, जुन्या अरुंद रस्त्यांवर सुसाट टॅंकरवाले असा चक्रव्यूह रचला गेला आहे.

विरार पश्चिमेला आणि सोपारा पुर्वेला जी प्रचंड बांधकाम सुरु आहेत ती पहाता वसईविरारला पुरेसा पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि प्रवासव्यवस्था देणारे राज्यकर्ते सत्तेवर कधी येणार हा या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here