निंबर्गी यांना आदर्श शिक्षण विस्ताराधिकारी पुरस्कार

0

मोहोळ (प्रतिनिधी) : मोहोळ तालुका पंचायत समिती शिक्षण विभागात शिक्षण विस्ताराधिकारी या पदावर कार्यरत असलेले सिद्धेश्वर निंबर्गी यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडस मुंबई, सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था, सोलापूर यांच्या वतीने सन २०१६ – १७ मधील जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षण विस्ताराधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             बोरामणी येथील श्री. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षण संकुलात झालेल्या स्काऊट-गाईड शिबिरात सदर पुरस्कार श्री. निंबर्गी यांना होटगी मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती शिवानंद पाटील हे होते, तर महिला बाल कल्याण सभापती रजनी देशमुख, स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस जयकुमार आलमेलकर आदी उपस्थित होते.

               शालेय जीवनापासूनच शिस्तीचे धडे देणारी ही स्काऊट व गाईड संस्था दरवर्षी शाळांची व पथकांची नोंदणी करते. या नोंदणीमध्ये मोहोळ तालुक्यातील कुरुल बीटने  बाजी मारली असून जास्तीत जास्त शाळांचा सहभाग नोंदविला गेला आहे. याचीच दखल घेत या बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांना आदर्श शिक्षण विस्ताराधिकारी या पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. निंबर्गी यांना हा पुरस्कार मिळाल्याने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्ताराधिकारी हरीश राऊत व विकास यादव तसेच समस्त शिक्षक बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here