बँकांना 80 हजार कोटी दिले कसे – शरद पवार

शेतक-यांना कर्जमाफी देताना काहींच्या पोटात दुखत होते

0

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी तिजोरीतून 80 हजार कोटी रुपये कसे दिले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार अकलूजमधील रत्नाची महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील,  विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर उपस्थित होते.

सरकार सोसायट्यांचे पैसे भरायला नाहीत असं सांगतंय. पण बँकांची तूट भरायला पैसे देतंय. ते पैसे आले कठून असा सवाल उपस्थित करत शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. शेतक-याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असं परखड मत शरद पवार यांनी मांडले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here