हॉटेलच खाणे स्वस्त झाले, 177 वस्तूंवरील जीएसटीत 18 टक्क्यांपर्यंत कपात

0

सर्व प्रकारच्या रेस्टराँमध्ये आता १८ टक्के ऐवजी पाच टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे हॉटेलमधील खाणं स्वस्त झाले आहे. १५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहे.

सरकारने तब्बल 177 गृहपयोगी वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आणत वाढीव जीएसटीवरून सरकारविरोधात वाढत चाललेली ग्राहकवर्गातली नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. आज गुवाहाटीत भरलेल्या जीएसटी कौन्सिलमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळले आहे. आता केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी कर लागणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांनी कपात केली आहे. सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

जीएसटी काऊंसिलने शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंना 28 टक्के स्लॅबमधून हटवलं आहे. त्यामुळे आता केवळ 50 लग्झरी प्रॉडक्टच 28 टक्के श्रेणीत राहतील.28 टक्के जीएसटी1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीचे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% अशी एकूण सहा दरआहेत. यामध्ये सर्वात जास्त वाढ 28 टक्के आहे. 28 टक्के जीएसटी वाहनं, लग्झरी वस्तूंसह जवळपास 200 वस्तूंवर लावण्यात आला आहे. तर दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर जीएसटी 28 टक्के असल्याने सामान्यांमध्ये नाराजी आहे. उदाहरणार्थ सिलिंग फॅनवर 28 टक्के जीएसटी आणि एअर कूलरवर 18 टक्के जीएसटी आहे. दुसरीकडे, शॅम्पू, टूथपेस्ट, शूज पॉलिश इत्यादी गोष्टींवरही 28 टक्के जीएसटी होता.मात्र आजच्या निर्णया नंतर डिओ, शॅम्पू, शेव्हिंग क्रीम, कॉस्मेटिक्स यांच्यावरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात येणार आहे. दरम्यान, जीएसटीच्या पहिल्या तीन महिन्यातच सरकारी तिजोरीत एकूण 2.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

काय स्वस्त होणार…..

या निर्णया मुळे सॅनिटरी नॅपकीन, सूटकेस, वॉलपेपर्स, प्लायवूड, स्टेशनरी आर्टिकल, घड्याळ, प्लेईंग इन्स्ट्रूमेंट्स, आफ्टर शेव, डिओड्रंट, वॉशिंग पावडर, ग्रॅनाईट आणिर मार्बल यांसारखी अनेक उत्पादनं आता 18 टक्क्यांच्या श्रेणीत येतात.

ही उत्पादनं स्वस्त नाहीत…

तर रंग, सिमेंट, वॉशिंग मशिन, फ्रीज आणि तंबाखू यांसारख्या उत्पादनांना तेवढीच किंमत मोजावी लागेल, असं म्हटलं जात आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here