महिला दिनी पोलीस दलातील रणरागिणींचा सन्मान

0

रवी सपाटे

 धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने महिला दिनानिमित्त ठाण्यातील मासुंदा तलाव,जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे धनगर समाजातील ठाणे,मुबई,नवी मुबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला.

सर्वसामान्याच्या रक्षणासाठी चूलमूल या संकल्पनेतून बाहेर पडत  पोलीस दलात योगदान देण्याच्या प्रांजळ उद्देशातून पोलीस दलात सामील होऊन कर्तबगारी बजावणाऱ्या धनगर समाजातील महिलांनी  आपल्या कर्तबगारीवर पोलीस दलात पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशी मजल मारली. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाबाबत समाजाद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची अभिमानास्पद थाप देत त्यांचा शालश्रीफ़ळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ठाणे गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सौ दीपाली लांबते,ठाणे गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सौ अमृता चवरे,पोलीस नाईक सोजर बंदीछोडे,पोलीस हवालदार विद्या खरबे (नवी मुंबई),मीरा पाबळे (मुंबई), श्रुती बावधाने (मुंबई),वैशाली फडतरे (ठाणे नगर पोलीस स्टेशन) आदींचा पोलीस महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉ सौ करे, समाजाच्या जेष्ठ महिला अर्चना वारे,जयश्री वीरकर,माजी नगरसेविका विशाखा खताळ,जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब दगडे,डॉ अरुण गावडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर,धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक कुरकुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ उपाध्यक्ष सुजाता बुधे,खजिनदार भारती पिसे,उपखजिनदार गायत्री गुंड,सदस्य संगीता खटावकर,अश्विनी पळसे,सुजिता कुचेकर, सीमा कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव संदेश कवितके,उपाध्यक्ष संतोष बुधे,खजिनदार कुमार पळसे,प्रचारप्रमुख अविनाश लबडे,उपसचिव अमोल होळकर,सल्लागार सुनील राहिंज,मनोहर वीरकर,कार्यकारणी सदस्य तुषार धायगुडे,सुरेश भांड,गणेश बारगिर,महेश पळसे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here