हिरलगेत सतीश पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : हिरलगे ( ता. गडहिंग्लज ) येथे काल (दि.११) रोजी विविध विकासकामांचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. अंगणवाडी दुरुस्ती, रस्त्याचे डांबरीकरण कामाचा प्रारंभ झाला. तसेच पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शचेही वितरण झाले व ज्येष्ठ नागरिकांच्या बाकड्यांचेही ह्यावेळी उदघाटन झाले.


यावेळी अरविंद पाटील, अरुण तेलंग, राजू पाटील, प्रकाश मोदर, सरपंच अनिता शिंदे, सदस्य शंकर लोखंडे, नाजूका यादव, सविता चव्हाण, सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप कुंभार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधाकर देसाई, राजाराम चव्हाण, उपाध्यक्ष भीमराव पाटील, हरिराम चव्हाण, तुकाराम घेवडे, रणजित घाटगे, रमेश गायकवाड, प्रकाश गायकवाड, विठोबा देसाई, नंदकुमार कदम, प्रकाश शिरूडकर आदी उपस्थित होते. यावेळी गोविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले तर माजी सरपंच सचिन देसाई यांनी प्रास्ताविक केले. उदय घाटगे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here